How To Identify Pitra Dosha

 

पितृदोष कसा ओळखाल?

जन्मपत्रिकेत पितृदोष आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी जन्मपत्रिका अथवा कुंडली असणे आवश्यक असते. कुंडली नसेल तर पितृदोष आहे किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अचूक जन्मवेळ लक्षात ठेवणे कोणाला जमत नाही. त्यामुळे बहुतेकांकडे जन्मपत्रिका नसते. परंतु यावरही जोतिषशास्त्रात एक तोडगा सांगितला आहे. त्या आधारे आपल्या कुंडलीत पितृदोष आहे क‍िंवा नाही, हे आपल्याला काही क्षणातच ओळखता येऊ शकते.

  1. कर्ज बाजारी होणे. व्यापार व व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती न होणे. नोकरी  जाणे.
  2. मुलांचे विवाह जुळणीत अथवा  शुभ कार्यात अडथळा उत्पन्न होत असतील. तसेच जुळलेले लग्न मोडले जात असतील  तर  पितृदोष ओळखावे.
  3. विवाह होऊन अनेक वर्ष झाले आहेत, परंतु घरात पाळणा न हलणे, गर्भपात होणे, अपंग मुले जन्माला येणे.
  4. कुटुंबात वडील व मुलगा यांच्यात नेहमी खटके उडणे. त्यांच्या प्रचंड मतभेद असतील.
  5. कुटूंबातील सदस्यांमध्ये आपापसात भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे. कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे. घरात अशांतता पसरणे.
  6. वाईट स्वप्न पडणे . स्वप्नात साप, हिंस्र प्राणी मागे लागणे.

Flip some book on your Flipkart !

Flipkart Search Bar
Flipkart.com