Pitra Pandharwada (Dosha) Simple Remedies

श्राद्ध : सोप्या विधीनुसार पूर्वजाना  प्रसन्न करा

अनंत चतुर्थीपासून पितृपंधरवड्यास प्रारंभ झाला आहे. श्राद्ध तिथीला आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी विधीपूर्वक श्राद्ध केले पाहिजे. जर आपल्याला काही कारणास्तव शास्त्रोक्त पद्धतीने श्राद्ध करता आले नाही तर खाली दिलेल्या सोप्या आणि सरळ विधीनुसार श्राद्ध करून तुम्ही आपल्या पूर्वजांना प्रसन्न करू शकतात.

– श्राद्ध तिथीला पहाटे उठून प्रातंर्विधी आटोपून देव घर स्वच्छ करावे. त्यानंतर गोमुत्र अथया गंगाजलाने ते शुद्ध करावे.
– घराच्या अंगणात रांगोळी काढावी.
– महिलांनी पित्तरासाठी स्वयंपाक करावा.
– श्राद्धाचे अधिकारी श्रेष्ठ ब्राह्मण अथवा जावई, व्याही, मेव्हणे यांना आमंत्रित करावे.
– ब्राह्मणाच्या हातून पितरांची पूजा करून तर्पण करावे.
– अग्नि प्रज्वलित करून गायीचे दूध, दही, तूप, खीर अर्पण कराये. गाय, कुत्रा, कावळा यांना नैवेद्य द्यावा.
– आदरपूर्वक ब्राह्मणभोज करावे. मुखशुद्धि, वस्त्र, दक्षिणा आदी देऊन त्यांना सम्मानपूर्वक निरोप द्यावा.

Pitru Pandharwada -Brahmin-Bhojan

Flip some book on your Flipkart !

Flipkart Search Bar
Flipkart.com