Waari 2012

These are the some Live Photos of  Waari 2012 by  Prasad Gosavi  (With Many Many Thanks)

दिवेघाट (पुणे सासवड रस्ता) गाठले. घाट चढत असतानाच पालखी आणि दिंडीचा ‘फील’ वाढत होता.मुख्य उद्देश दिंडी सोबत चालणे आणि काही वेगळा अनुभव घेणे असा होता…

सर्व उद्देश अपेक्षेपेक्षा फार फार आणि फारच जास्त फळाला आले. अनुभव तर इतका पवित्र आणि निष्पाप होता कि सध्याच्या जगात खरच ‘इतकं साधं’ राहणे कसे शक्य आहे ह्यावर मोठ-मोठे लेख आणि ‘अनुमोदन’ हजारो/ लाखो रुपडे घेवून आणि देवून पण करता येईल.

प्रत्येक वारकरी हाच खरा विठ्ठल, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि तमाम संत असतो हे खरच मला पटले. इतकेच काय प्रत्येकजण एकमेकाला माऊली – माऊली म्हणूनच बोलावतो. वयाचा आणि साहजिकच कशाचाही अभिमान (गर्व) न बाळगता एकमेकांच्या पाया पडतात. जरी दिंडीला १-२-१००-१४० काहीजरी क्रमांक असले तरी ते कोणाच्या तरी दुसऱ्याच्या सोयीसाठी असतात हे समजले. आपल्या दिंडीमध्ये दुसरा कोणी आला तर काही कोणाला तमा नाही. रस्त्याने जाताना मध्येच छोटेखानी भजन करतात, भजन संपताच जमिनीला आणि वीणा/ मृदुंग वादकाच्या पायाला स्पर्श करणे (वयाची पर्वा न करता) खरच साधी (किंवा खायची) गोष्ट नाही. मी सुद्धा आता आलो दिंडीमध्ये तसेच वागावे म्हणून ४-६ वेळा असा प्रयोग केला दर वेळी पायाला स्पर्श करताना आपल्या शरीरात अचानक काहीतरी शक्ती आणि औसान आल्यासारखे वाटे.

.

ज्यांना खरच असे वाटते कि आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे कामाची/ घराची/ आयुष्याची/ कुटुंबाची आणि आपण नसेल तर जग कसे चालेल त्यांनी आयुष्यात (शक्य तितक्या लवकर) कमीत कमी ८-१० किलोमीटर किंवा ४-५ तास ह्या वारकरी संप्रदायात घालवावे असे मी आज आवर्जून आणि अनुभवाने सांगू शकतो. प्रत्येकजण फक्त आणि फक्त ‘पामर’ आहे हे समजल्याशिवाय तुम्ही आयुष्य ‘एन्जोय’ करू शकणार नाहीत

काटेवाडीत रंगणार ‘गोल रिंगण’…

निरा स्नानानंतर माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. यावेळी माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी साता-याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. अतिशय भक्तीभावाच्या वातावरणात माऊलींचं स्वागत करण्यात आलं.  आजही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणंद इथे असणार आहे. तर तुकाराम महाराजांची पालखी काल उंडवळी गवळ्याचीवरुन मार्गस्थ झाली. ब-हाणपूर, मोरेवाडी, सराफ पेट्रोल पंप, बारामती असं मार्गक्रमण करुन काल बारामती इथं पालखीचा मुक्काम होता. आज तुकोबांची पालखी संसरला पोहचेल. दरम्यान, काटेवाडी इथं दुपारी मेंढ्यांचा गोल रिंगणाचा सोहळा पार पडणार आहे. (20.06.2012)

2 thoughts on “Waari 2012

  1. I was always watching this Waari events on Media. It gives me so Pleasure to watch. But Certainly I have Created this blog this year,which gives me Happiness….. JAI JAI RAMKRISHNA HARI,
    JAI JAI RAMKRISHNA HARI, JAI JAI RAMKRISHNA HARI, JAI JAI RAMKRISHNA HARI,

  2. Very best Blog, i like simple and best presentation